Mar 26, 2012

आई


आई का येतात ग आसवं डोळ्यात तुझ्या,

आई का येतात ग आसवं डोळ्यात तुझ्या,
जेव्हा वेदना ह्या होतात, थोड्याशाही मला..?
न ऐकताच कसं कळत ग आई तुला,
कि काळजाचा एक ठोका चुकला माझ्या..?
का होतं ग मन प्रसन्न माझं,

तू जेव्हा एक हाक देतेसमला..?

न सांगता कुणी कसं जाणवतं तुला,

कि गरज तुझीच आहे तुझ्या लेकराला..?

आई खरंच सांग ना,

का इतकं जपतेस ग तू, या तुझ्या बाळाला..?

तुझ्या प्रेमासारख..तुझ च प्रेम आई,

नाही दुसरी उपमा, आई तुझ्या प्रेमाला...!