May 18, 2012

सूळसुळात वारा जेव्हा …,




 सांग

सूळसुळात वारा जेव्हा …,
पावसासंगे वाहेल,
सांग माझ्या येण्याची …..,
चाहूल तुला किती रे लागेल?
पावसाचे थेंब तुझ्या ओठावर येतील …,
सांग तेव्हा माझ्या नावाची आसवे
त्यात कितीरे लपवशील…… ?
अलगद वारा हळुवार वाहील …,
संगती मी नसताना भास माझा होईल ………
सांग माझ्या नसण्याचा ……….,
तेव्हा तुला खरच त्रास होईल………?