May 9, 2012

मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी


चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.

बंटू : अरेरे बिच्चारी.

चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.

बंटू : तुला कसं रे कळलं.

चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी चप्पल करकरीत नवीन आहे.




 गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?

मंजू : झेब्रा.

गणपुले सर : असं का बरं?

मंजू : कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना