May 3, 2012

भेटी लागे जीवा, लागलेली तुझीच आस




भेटी लागे जीवा, लागलेली तुझीच आस
पाहतोय क्षणोक्षणी भवताली आस-पास
दिसताहेत सगळीकडे फक्त तुझेच भास
आणि मनांत माझ्या आठवणींची आरास !




कळीचं फुलनं हा तर तिचाच गुण
वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खूण...

पाखराचे बोल कुणासाठी गाणे
कुणा येई धुंदी कुणी छेडि तराणे...

कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद
कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद...




कधी कधी मला भीती वाटते या भयाण अंधाराची .
मजा सावलीलाही ओढून नेणाऱ्या त्या भयाण काळोखाची,
कधी कधी मला भीती वाटते हे जीवन जगण्याची
कधीही ओढून नेणाऱ्या त्या भयाण मृतूची.
कधी कधी मला भीती वाटते या अमानुष समाजाची,
तुज नि मजा निखळ मैत्रीला गालबोट लावण्याची.
कधी कधी मला भीती वाटते तुज माजात अंतर पडण्याची.
तुज शिवाय हे एकाकी जीवन जगण्याची.