May 20, 2012

शाळा सुटली, पाटी फुटली



शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मजला भूक लागली ॥धृ.॥

शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली ॥१॥

धम्मक लाडू चापट पोळी
नको देऊ मज हवीच गोळी
किंवा दे ग, खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली ॥२॥

सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावरि खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली ॥३॥