संत चोखामेळा - श्रीमुखाची शोभा कस्तुरी.
श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट । उभा असे नीट विटेवर ॥१॥
कर दोनीं कटीं कुंडल झळकती । तेज हे फाकती दशदिशां ॥२॥
वैजयंती माळा चंदनाची उटी । टिळक लल्लाटीं कस्तुरीचा ॥३॥
चोखा म्हणे माझ्या जीवींचा जीवनु । पाहतां तनु मनु भुलोनी जाय ॥४॥
संत चोखामेळा - अनादि निर्मळ वेदाचें ज...

अनादि निर्मळ वेदाचें जें मूळ । परब्रह्म सोज्वळ विटेवरी ॥१॥
कर दोन्ही कटीं राहिलासे उभा । नीळवर्ण प्रभा फांकतसे ॥२॥
आनंदाचा कंद पाउलें साजिरीं । चोखा म्हणे हरी पंढरीये ॥३॥
संत चोखामेळा - गोजिरें साजिरें श्रीमुख...
संत चोखामेळा - व्यापक व्यापला तिहीं त...
व्यापक व्यापला तिहीं त्रिभुवनीं । चारी वर्ण खाणी विठू माझा ॥१॥

गोजिरें साजिरें श्रीमुख चांगलें । ध्यानीं मिरवलें योगीयांच्या ॥१॥
पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरीं । वैकुंठाचा हरी उभा विटे ॥२॥
राई रखुमाई सत्यभामा नारी । पुंडलिकें सहपरिवारीं आणियेला ॥३॥
वैजयंती माळ किरीटकुंडलें । प्रेमें आलिंगिलें चोखियानें ॥४॥
पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरीं । वैकुंठाचा हरी उभा विटे ॥२॥
राई रखुमाई सत्यभामा नारी । पुंडलिकें सहपरिवारीं आणियेला ॥३॥
वैजयंती माळ किरीटकुंडलें । प्रेमें आलिंगिलें चोखियानें ॥४॥
संत चोखामेळा - व्यापक व्यापला तिहीं त...
व्यापक व्यापला तिहीं त्रिभुवनीं । चारी वर्ण खाणी विठू माझा ॥१॥
शंख चक्र करीं वैजयंती माळा । नेसला पिवळा पितांबर ॥२॥
कटावरी जेणें कर हे ठेविले । ध्यान मिरविलें भीमातिरीं ॥३॥
चोखा म्हणे माझा आनंदाचा कंद । नाम हे गोविंद मिरविलें ॥४॥
संत चोखामेळा - अनाम जयासी तेंचि रुप ..

अनाम जयासी तेंचि रुप आलें । उभें तें राहीलें विटेवरी ॥१॥
पुंडलिकाच्या प्रेमा युगें अठ्ठावीस । समचरणीं वास पंढरीये ॥२॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कनवाळू । जाणें लळा पाळू भाविकांचा ॥३॥