May 18, 2012

अमेरिकेत जेव्हा घरातली वीज जाते






अमेरिकेत जेव्हा घरातली वीज जाते,
तेव्हा तिथली लोकं लगेच पॉवर हाऊसला फोन करतात आणि प्रॉब्लेम समजून घेतात.

जपानमध्ये जेव्हा घरातली वीज जाते, तेव्हा तिथली लोकं लगेच फ्युज तपासतात आणि लगेच बदलून घेतात.

भारतात जेव्हा वीज जाते, तेव्हा इथली लोकं शेजाऱ्यांच्या घरी डोकावतात आणि म्हणतात.... सगळ्यांचीच गेलीय ना... मग जाऊ देत..!!!






सोनू -आज मला खूप मार पडला.
मोनू- का?
सोनू- शेजाऱ्यांचा मुलगा हरवला.
मोनू- मग तू काय केलं?
सोनू- मी त्यांना सांगितलं गुगलवर सर्च करा सापडला तर डाउनलोड करा!





झम्प्या-गम्प्या दोघे युद्धभूमीवर असतात. झम्प्या अंगावर मच्छरदाणी घेऊन लढायला निघतो.

गम्प्या : ओय...हे काय? बुलेटप्रूफ जॅकेट न घालता तू हे काय अंगावर चढवतोय?

झम्प्या : अरे यार...डोण्ट वरी... ज्यातून एक मच्छर आत घुसू शकत नाही त्यातून गोळी काय आत शिरणार?