एका ट्रिप ची गोष्ट:- बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.” सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ”एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.” नव-याने प्रेयसीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.” प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ”मी एका आठवड्यासाठी [...]
बळवंतराव एक दिवस अचानकच गेले.त्यांच्या बायकोने पेपरला फोन करुन ते गेल्याची जाहिरात द्यायची ठरवले.त्यांनी पेपरला फोन करुन सांगितले,” जाहिरातीत छापा “बळवंतराव आज सकाळी अचानक गेले.”पलिकडुन जाहिरात घेणारा म्हणाला अहो, तुमचे शब्द फारच कमी होतात. अजुन काही शब्द वाढवा.बायको म्हणाली, तर छापा,”बळवंतराव आज सकाळी अचानक गेले. त्यांची सायकल विकायची आहे.”
डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबिज हा रोग झाला आहे. तुम्ही यातुन बरे व्हायची शक्यता फार कमी आहे. पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का ? डॉक्टर : कागद व पेन कशासाठी ? पेशंट : यादी तयार करतो. कुणा कुणाला चावायच आहे अशा लोकांची.
