Jul 1, 2012

छत्रपति संभाजी महाराज(प्रथम)



छत्रपति संभाजी महाराज(प्रथम)
महाराणी ताराबाई आणि राजा शिवाजी यांना हटवून संभाजीराजे गादीवर बसले..या घटनेच्या काही दिवस आधी दक्षिण भारतात दोन महत्वपूर्ण घटना घडल्या.ओक्टो १७१३ मध्ये निजामाने दक्षिणेत मोघलांची सुभेदारी मिळवली आणि पुढच्याच महिन्यात नोव्हे.१७१३ मध्ये शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे बनवले..
संभाजी महाराजांनी सत्ता हातात घेतली तेंव्हा त्यांचे वे १६ वर्षाचे होते...पण सुर्वतिचा कारभार ताराराणी पाहत असल्याने त्यांना राज्यकारभाराचा अनुभव नव्हता, त्यामुळे सर्व कारभार रामचंद्रपंत अमात्य पाहत होते...
सातारा आणि कोल्हापूर या दोन राज्यात लढाई चे प्रसंग चालूच होते...याच दरम्यान रामचंद्रपंत अमात्य यांचे निधन झाले...त्यांच्या निधनाने संभाजीराजांचा मोठा आधार गेला..
१७१८ च्या आसपास संभाजीराजांजवळ १० जिल्हे २७ किल्ले तर शाहू महाराजांजवळ ४६ आणि कान्होजी आंग्रे यांच्याकडे १९ किल्ले होते..
१७१८ मध्ये शाहू महाराज आणि मुघल यांच्यामध्ये महत्वपूर्ण करार झाला...तो करार खालील प्रमाणे...
१) छत्रपति शिवाजी (थोरले) यांच्या शासनकाळातील सर्व किल्ले शाहू महाराजांच्या हवाली करावेत..
२) मराठा सरदारांनी जिंकलेला प्रदेश मराठ्यांच्या स्वराज्यात सामिल केला जावा..
३) मुघलांच्या दक्षिणेतील मुलुखात चौथाई वसूल करण्याचे अधिकार मराठ्यांकडे राहतील... आणि त्या बदल्यात मराठे आपली १५ हजार फौज बादशहाकड़े मदतीला ठेवतील...
४) मराठे प्रतिवर्षी बादशहाला १० लाख रुपये नजराना देतील..
५) शाहू महाराज यांच्या मातोश्री येसूबाई यांना मुघलांच्या कैदेतुं mukt करून parat स्वराज्यात आणन्यात येईल.
या तहाच्या शेवटच्या अटीनुसार सन १६९० मध्ये कैद झालेल्या येसूबाई यांना घेवून ४ जुलै १७१९ मध्ये बाळाजी पेशवे सातारयात आले..
तब्बल २९ वर्षांनी येसूबाई स्वराज्यात आल्याने महाराष्ट्राच्या लोकांना आनंद झाला..
संभाजीराजांनी सुद्धा शाहू महाराजांना पत्र लिहून येसूबाई यांच्याबद्दल आदर आणि आनंद व्यक्त केला...छत्रपतिंच्या दोन्ही घराण्यात कितीही राजकीय तंटे असले तरी त्यांचे पारिवारिक संबंध इतके सलोख्याचे होते हे आश्चर्यकारक असले तरी सत्य आहे.वरील सर्व घटना घडत असताना छत्रपतिंच्या दोन्ही घरान्यांची वाटणी व्हावी असेही प्रयत्न होत् असावेत, पण ते सफल झाले नाहीत..याच दरम्यान संभाजीराजांनी चंद्रसेन जाधवाच्या मध्यस्तीने निजामाशी मैत्री करण्याचे ठरवले..निजाम या संधीची वाटच पाहत होता...निजामाने राज्याच्या वाटणीबद्दल संभाजीराजांच्या मनातील असंतोषाचा फायदा उठवन्याचे ठरवले..त्याने चौथाई आणि सरदेशमुखीचे पैसे शाहू महाराजांना द्यायचे बंद केले.
नंतर निजामाला पुन्हा दिल्लीला जावे लागले..परंतु, तिथे त्याने दक्षिणेची सुभेदारी पुन्हा मिळवली आणि ऑगस्ट १७२० मध्ये तो पुन्हा दक्षिणेत आला..याच्या ५ महीने आधी एप्रिल १७२० मध्ये शाहुंनी बाळाजीचा पराक्रमी पुत्र बाजीराव यांची पेशवे पदावर नियुक्ति केली..
सातारा आणि कोल्हापूर यांच्यातील संघर्ष चालूच होता..याचदरम्यान बाजीरावाने निजामाचा पल्खेद येथे झालेल्या लढाईत दारुण पराभव केला..निजामाच्या पराभवानंतर संभाजीराजांचा आणखी एक साथीदार कमजोर पडला..या लढाईनंतर शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या विरुद्ध निर्णायक लढाई करण्याचे ठरवले..