सह्याद्री -मानवंदना. . . . .
सह्याद्री नामा नग
हा प्रखंड,हा दक्षिणेचा अभिमानदण्ड |
ज्वालामुखींनी जरी निर्मियेला,पवित्र
तो रामपदे जहाला |
शिरावरी शंभू विराजताहे,कन्याकुमारी पद धूत
आहे |
स्कंधावरी दुर्गम दुर्ग ज्याच्या, हाती झळाळे
परशु तयाच्या |
उन्मत्त निर्दालन दक्ष राही,निर्वासितां
आश्रय लाभ देई ,
ही पुण्यभूमी तशी त्यागभूमी|
स्वातंत्र्यलक्ष्मी तशी कर्मभूमी ||
आधार, आदर्श हि भारताला , प्रसाद त्याचाच
आम्हा मिळाला |
झेंडा तयाचा भगवा विराजे, तयापुढे मस्तक नम्र
माझे ||
सह्याद्री नामा नग
हा प्रखंड,हा दक्षिणेचा अभिमानदण्ड |
ज्वालामुखींनी जरी निर्मियेला,पवित्र
तो रामपदे जहाला |
शिरावरी शंभू विराजताहे,कन्याकुमारी पद धूत
आहे |
स्कंधावरी दुर्गम दुर्ग ज्याच्या, हाती झळाळे
परशु तयाच्या |
उन्मत्त निर्दालन दक्ष राही,निर्वासितां
आश्रय लाभ देई ,
ही पुण्यभूमी तशी त्यागभूमी|
स्वातंत्र्यलक्ष्मी तशी कर्मभूमी ||
आधार, आदर्श हि भारताला , प्रसाद त्याचाच
आम्हा मिळाला |
झेंडा तयाचा भगवा विराजे, तयापुढे मस्तक नम्र
माझे ||
