पावसाची गुंज
पाखरांची कुजबुज
का ऐकू येत नाही
सावलीची अलगुज
रिता आहे वारा
गंध वेडा तो नाही
सूर तेच तरीही
रास रंगला नाही
आस तुझी ध्यास तुझा
भेटशील ना रे.........
स्वप्न राहील अपुरे
तुझविन सख्या रे...........
सूर तेच तरीही
रास रंगला नाही
आस तुझी ध्यास तुझा
भेटशील ना रे.........
स्वप्न राहील अपुरे
तुझविन सख्या रे...........
