skip to main |
skip to sidebar

एक छोटीशी कळी मायेच्या कुशीत उमलली
आईनं परि म्हटलं तिला अन बाबांची झाली ती लाडली
या चिमुकलीच्या येण्यानं सारं घर गजबजून गेलं
कालपर्यंत उंच भासणारं आभाळही आज जणू ठेंगणं वाटू लागलं
हळूहळू चिमणी आता रांगायला लागली
घराची मोठी जागाही आता कमी वाटायला लागली
दिवसभर दंगा करून सारं घर डोक्यावर घायची
स्वतः शांत झोपायची आई बाबांना रात्ररात्र जागवायची
डगमगत का होईना ती चालायला लागली
पण तोल जावून ती पडली तेव्हा जखम आईच्या काळजाला झाली विचारत
आता लाडली हळूहळू बोलायला लागली
ती आधी आई म्हणेन कि बाबा घरात याचीच शर्यत लागली
पण परंपरेनुसार तिनही "आईच" शब्द उच्चारला
बाबा शर्यत हरले पण त्यांनी सहज हसूनच आपला मोठेपणा दाखवला
आता चिमणीच नाव एका शाळेमध्ये घातलं
"आई -बाबा" नाव पाटीवर गिरवण सुरु झालं
येथून पुढे बरेच क्षण आनंदाचे आले
चिमणी मोठी झाली पण तिचे बालपण डोळ्यातच राहिले
सतत जबाबदारीचे ओझे असल्याने बाबांना कधी निवांतपणे बोलणे जमलेच नाही
सकाळी बाबा कामासाठी लवकर निघून जायचे अन घरी आल्यावर
एकच प्रश्न असायचा ......" झोपली का गं ताई ?? "
वेळ कधी थांबत नाही हा तर आहे सृष्टीचाच नियम
लग्न होवून लाडली सासरी निघून जाणार.......
याचीच चिंता वाटायची आई बाबांना कायम
खूप प्रेम लावून आईबाबांनी या कळीचा गुलाब केला
एक राजकुमार येवून तो गुलाब घेवून गेला
आता हि आनंदान भरलेली बाग क्षणभरात रिकामी झाली
लेक सासरी जात असताना आईबाबांच्या डोळ्यांत अश्रूंची धार लागली
आता येथे सारं काही आहे फक्त चिमणीच तेवढी नाही
कधी माहेरी परतणार माझी लाडली सारखी विचारत असते तुझी "आई ".........