Aug 22, 2012

मधुर त्या लहरींवरती



जलधारा

रिमझिम ह्या जलधारांवरती
मधुर त्या लहरींवरती
रानपाखरे नाचत होती
विसरुन देह भान रिती..........

गवतावरचे थेंब टपोरे
मातीतुन गंध दरवळे
स्रुष्टीचे चैतन्य आगळे
पानाफ़ुलांवर फ़ुलले...............

क्षणात मेघ बरसुनी जाती
वसुंधरा हिरवी होती
उन-पाउस खेळ खेळ्ती
श्रावणात या सरींवरती............

बघुन ही सारी अवनी
मनास वाटे जावे भिजुनी
जलधारांच्या तालांवरती
तनमन चिंब होउन सजणी