Aug 19, 2012

मनांत नसतांना


मनात नसतांना कुणाला तरी
कधी कधी दुखवावे लागते
उत्तर माहीत नसलेल्या प्रश्नांना
मनात कधीतरी सामोरे जावे लागते.....
मनात नसतांना कुणाला तरी
कधी कधी फसवावे लागते...
दिशा माहीत नसलेल्या वाटसरुला
मिळेल त्या वाटेने जावे लागते!!
हरीत फांदीच्या मनात नसतांना
फुलाला डहाळीवरुन पडावे लागते!!
आणि माणसांच्या मनात नसतांना
कधीतरी जगातुन जावे लागते!!
मनात नसतांना कधीतरी,कोणाच्या तरी
प्रेमात पडावे लागते...आणि.....




प्रेमभंग झाल्यास त्या प्रेमाची आठवण
घेत आयुष्य घालावं लागते!!!


मनांत नसतांना............