येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
मि देतो ...... ला श्रिखद चा घास
भाजित भाजि पालक,
...माझि मालकिन अन् मि मालक !
भाजीत भाजी मेथीची,
......माझ्या प्रितीची.
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
....ची माझ्या र्हुदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
संतांच्या वाणीत आहे 'सोनियांच्या (ज्ञानाच्या)
खाणी',
.... आहेत माझे कुंकूवाचे धनी
ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,
...सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे
तुमच्या आशीर्वादाचे.
गोरया गोरया हातावर रेखाटली मी सुबक मेंदी,
....चे नाव घेण्याची वारंवार येवो संधी
