एकदा एका धीट व साहसी माणसाने दुसर्या माणसाबरोबर एकदम अशी पैज मारली की, दहा वर्षात आपण गाढवाला लिहिण्यास, वाचण्यास व हिशेब करण्यास शिकवू. त्या माणसाचा एक मित्र तेथे होता, तो त्याला म्हणाला, 'अरे, तुला वेड तर नाही लागलं. दहा वर्ष सोडून तू जरी शंभर वर्ष सारखा प्रयत्न केलास तरी गाढव लिहिणं, वाचणं शिकणार आहे काय ?' पैज मारणारा यावर उत्तरला, 'मित्रा, तू काही काळजी करू नकोस, कारण दहा वर्षे हा काळ काही थोडा नाही. एवढ्या काळात मी, हा माणूस किंवा ते गाढव यापैकी कोणीतरी नक्की मेल्याशिवाय राहणार नाही. तसं झाल्यावर मला पैज हरण्याचा प्रसंगच येत नाही.'
कविता, वात्रटिका, सुविचार, चुटकुले, चारोळ्या, बोधकथा, प्रेमकथा, मराठी विनोद, आरती संग्रह, मराठी मुलांची नावे, मराठी मुलींची नावे, गमतीदार उखाणे, ग्राफिटी वाल्स, मराठी एस एम एस, मराठी अभंग, मराठी गझल,मराठी पोवाडा, बाल गीते, भजन, भारुड, मराठी म्हणी, स्तोत्रे, उखाणे आणि बरेच काही...
Aug 7, 2012
माणूस व गाढव