Feb 11, 2013

Marathi Kavita मराठी कविता



अगं वेडे।। 
नाही समजू शकलीस तू 
माझे प्रेम,
त्या  डोळ्यातून ओघळनारे
ते अश्रुंचे थेंब ,
तू येशील म्हणून वाट पाहणारी
ती नजर,
पण नाही केल़ीस तू त्या
वेळेची कदर ,
अगं वेडे।।
फुलासारखा जपयचो,मी तो तुझा
प्रत्येक शब्ध,
तुझ्या ओठावरचे हसू पाहताच हॊऊन 
जायचो मंत्रमुग्ध,
जेव्हा तुझ्या नजरेला नजर माझी
भिडून जायची,
 तेव्हा ती नजरही तुझीच
हॊउन जायची
अगं वेडे।। 
वेळ तर निघून गेलीय
आठवन ठेऊन
 पण तू मात्र अजुनही जातेस
माझ्या ह्रधयाजवलून ,
वेडापीसा हॊउन जीव तुझीच
वाट बघतो,
 पण,तू आलीच नाहीस म्हणून  स्वप्न मनाशी
बाळगून जगतो।।।।