मन का माझे एका पाखरासारखे
कल्पनेच्या उंच भरारी मारणारे
अन रोज एक नवे क्षितीज शोधणारे
मन का माझे पावसाच्या दवान सारखे
शब्दांच्या पाना फुलांच्या वेलीवर रमणारे
अन त्या शब्दांतून नव्या कविता रचणारे
मन का माझे त्या तलासुरांसारखे
पुन्हा त्या शब्दांना चालीत गुंफणारे
अन त्या एका गोड संगीतात रमणारे
मन का माझे असे ......