Mar 28, 2012

इतरांची होणारी प्रगतीकडे पाहून स्वतःसाठी कधीही काळजी करु नका..!

कारण कोणत्याही सुंदर रचनेला आकार घेण्यासाठी थोडा वेळ लागतो...!
जीवन खुप सुंदर आहे म्हणुन उद्याचा विचार करुन आपला 'आज' वाया घालवू नका...!
=========================================================================
नियम 1.
जीवन चांगले असेलच असे नाही. त्याचा चांगला वापर करायला शिका.

नियम 2.
जग हे तुमच्या सन्मानाची कधीच प
र्वा करणार नाही. त्यासाठी आधी तुम्हाला काही तरी करून दाखवावे लागेल.
=========================================================================
माणसाने आपल्या चुका आणि दुसऱ्याचे सदगुण पाहावे
=========================================================================
आपल्या आयुष्यात कोण येणार आहे हे वेळ ठरविते

आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे हृदय ठरविते

पण आपल्या आयुष्यात
कोण टिकून राहणार आहे हे मात्र आपला स्वभावच ठरवितो 
=========================================================================
संकटे हि नेहमी चांगल्या माणसांच्याच वाट्याला येतात,

कारण

ते त्या संकटांना चांगल्या प्रकारे हाताळण्याची ताकद ठेवतात 