May 9, 2012

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर



डोळे पुसायला कुणीतरी असेल तर,
रुसायला बरं वाटतं.
ऐकणारे कुणीतरी असेल तर,
मनातलं बोलायला बरं वाटतं.
......
कौतुक करणार कुणीतरी असेल तर
थकेपर्चयत राबायला बर वाटतं,

नजर काढणारं कुणीतरी असेल तर,
नटायला बरं वाटतं.

अस आपल कुणीतरी असेल तर,
मरेपर्यत जगायला बरं वाटतं




आजहि मन माझे खूप उदास....
अजून होतो तुझ्या त्या ,
आठवणींचाच आभास ....
होत नाही आजही विश्वास....
खरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास.......!!!!