मी तुझी नेहमी आठवण काढेन
तू काढलीस नाही तरी चालेल,
होऊन होऊन काय होणार आहे
थोडसं वाईट वाटेल माझ्या मनाला एवढंच ना..?
तुला स्वप्नातही वाटणार नाही
इतके प्रेम देऊन जाईन मी, आयुष्भर तुझी साथ देणारे
अगणित प्रेम-पुरा वे कशी जाळशील तू
आता..?
मी समोरून येताना दिसल्यावर
कदाचित तू रस्ताही बदलशील,
पण जरा विचारून बघ स्वतःला मिटवू शकशील का तू हृदयातील
माझी प्रतिमा..?
स्वप्नांच् या दुनियेत हरवशीलही तू
अवकाश्यात उंच झेप घेशीलही तू,
मात्र माझ्या इतके प्रेम करणारे हृदय
सांग सखे, पुन्हा हेच हृदय शोधू शकशील का तू ..
