May 14, 2012

आज मी रडणं सोडून दिल





आज मी रडणं सोडून दिल,
त्याच्या आठवणीत फिरन सोडून दिल,
सोडून दिला मी तो भूतकाळ,
अन त्या भूतकाळा बरोबर,
मी त्याच नाव हि सोडून दिल....
...
सोडून दिल मी सगळं काही,
ती वचन, त्या कविता,
ते प्रेम, ते दुखं ...
हे सगळ हि मी सोडून दिल....
आज मी रडन सोडून, हसन सुरु केल,
परत आयुष जगन सुरु केल,
नव्या जोमाने ह्या आयुष्याच्या वाटेवर,
परत मी एकट चालन सुरु केल...
अन बदलत्या जागा बरोबर,
आज मी हि बदलन सुरु केल...
आज मी हि बदलन सुरु केल..