May 9, 2012

महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जणांची आई.



महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जणांची आई...

तुझ्या कुशीतुन सकळांसाठी अंकुर्ते अंगाई...

संघर्षाचे शौर्य दिले तु धैर्य दिले जगण्याचे..

तुझ्याच ठाई क्रूतार्थ व्हावे अवघे जीवन आमचे...

तुझाच जयजय कार असावा सदैव आमच्या ओठी...

दरी खोर्यातुन नाद घुमु दे एकच दिन राती....