May 9, 2012

जाता जाता एकदा तरी

जाता जाता एकदा तरी
भाव माझ्या डोळ्यातील वाचशील का ?
झाले गेले सारे विसरून
नव्या आयुष्याची आशा माझ्याकडून घेशील का ?
जाता जाता एकदा तरी माझ्याकडे पाहशील का ?
सुखदुखाचा प्रेमप्रवास आठवणीत ठेवशील का ?
माझ्यासाठी कधी तरी दोन अश्रू ढाळून
अबोल प्रेम माझे जाणूनी तू घेशील का ?
जाता जाता एकदा तरी माझ्याकडे पाहशील का ?
वर्षानुवर्षीचे प्रेम अपुले
ह्र्दयात साठून तू ठेवशील का ?
त्यासाठी माझ नाव तुझ्या ह्र्दयात कोरशील का ?
जाता जाता एकदा तरी माझ्याकडे पाहशील का ?
आयुष्य भराची वाचणे दिलीस
ती सारी आता पुसून देशील का ?
जाता जाता माझ्या नजरे ला नजर भिडवशील का ?
जाता जाता एकदा तरी माझ्याकडे पाहशील का ?
होते नव्हते आता सारे संपले
शेवटी आठवण म्हणून
तुझा हात माझ्या हाती देशील का ?
जाता जाता एकदा तरी माझ्याकडे पाहशील का ?