skip to main |
skip to sidebar
एका मराठी लेखकाच्या आत्मचरित्रांच प्रकाशन झाल्यावर आठच दिवसांनी त्यांची मुलाखत घेणाऱ्या एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला,
"आत्त्मचरित्र लिहून तुम्हाला काय मिळालं?"
’दोन हजार शत्रू," लेखक महोदय म्हणाले!
मराठीच्या शिक्षकांनी दादूला प्रश्न केला, "कवी यशंवताच्या जन्म-मृत्यूचे इसवी सन सांग."
"माहीत नाहीत सर."
दादू म्हणाला. "माहीत नाही? पुस्तक काढून यशवंताची कविता पाहा. परिचयात त्यांच्या नावापुढे कंसात काय लिहिलय ते वाच!" शिक्षकांनी आज्ञा दिली. दादूनं पुस्तक काढून वाचल, "यापूर्वी कधी वाचलं नव्हतं का हे?" शिक्षकांनी विचारलं. "हे तर माहीत होतं मला," "मग माहीत नाही असं का म्हणालास?" शिक्षक रागावले. "मला वाटलं हे त्यांचे दूरध्वनी क्रमांक असावेत, दादू म्हणाला!!
आपल्या पुस्तकातील एका कवितेचे पान पुढे धरीत कविवर्य नारायण सुर्व्यांच्या चिरंजीवानी, रवींद्र सुर्वेने मागणी केली, "हे पहा, तुमच्या कविता आम्हला अभ्यासाव्या लागतात. तुम्हीच ही कविता शिकवा मला,"
"नको, बुवा, या कवितेचा अर्थ तू आपल्या शिक्षकांनाच विचार," नारायण सुर्वे म्हणाले. "पण ही कविता तुम्ही शिकविली तर’
‘अरे, ही कविता मी शिकविली तर अर्थ चुकेल अन् शून्य मार्क मिळतील तुला," नारायण सुर्वे त्याला समाजावित म्हणाले!