May 24, 2012

नाही बरसले ढगही पुन्हा.




महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील जनतेची हाक. . .

नाही बरसले ढगही पुन्हा.
धरणीचे आंगण सजवाया.
पिकही ना तरले उभ्या रानात,
पोटांची या खळगी भराया.
धरणीची हो माया आटली,
इथ ना कोणी तहान भागवाया.
आपुलकीची नाळ तुटली.
कुंपणच उठले शेत खाया.
दुष्काळाच्या या चित्ते वरती,
सारे काही भाजत आहे .
राणा शिवारात आमच्या,
सुतक शांतता भासत आहे.

फक्त सुतक शांतता भासत आहे . . .