May 24, 2012

आकाशातला एक तारा आपला असावा



आकाशातला एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा,
एक छोटे जग प्रत्येका जवळ असावे,
जगाच्या या गर्दित कुणीच एकटे नसावे



डोळ्यांचे ही किमया
फारच न्यारी असते
डोळे असुन आंधळे बनन्याची
चाल काहींना प्यारी असते



पावसात या खूप भिजावेसे वाटते
चिंब झालेल्या हिरवळीवर फिरावेसे वाटते
ते टपोरे थेंब पावसाचे ओंजळीत घेउनी
आयुश्यातील प्रत्येक क्षणाला आनंदाचे
उधाण द्यावेसे वाटते...



यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे,
हे मी सांगू शकणार नाही.
पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी,
स्वतःकडून नेमके काय हवे आहे;
हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.