भेटणे तुझे मृगजळापरी
नाही त्यावरी काही विश्वास
सतत सोबत तुचं असावी
हा होता जीवनाचा एक ध्यास
म्रूगजळामागे धावणे आताशी
हा माझा सुध्दा छंद आहे
तु ही तर असेचं करते
यात वेगळा आनंद आहे
सोबतीला मी असताना ही तुझ्या
तु अशी कोणत्या स्वप्नात हरवते
हातचे अनमोल क्षण घालवूनी
मॄगजळाच्या मागे का ग धावते
हा तुझा अस्पष्ट्पणा नेहमीचं
भावतो कोमल मनास माझ्या
असूनही तुझे हे नसणे जागेवरी
मन तुझे विचारात असते कुणाच्या??
तू जाताना काही न सांगीतले
पुन्हा भेटू कधी ही मनी आस आहे
अजूनही तू अगदी तशीचं असावी
की हा तर मनाचा खुळा भास आहे
माला वाटते रे आता पुन्हा जन्मावे
परत फिरुनी फक्त तुलाचं भेटावे
परत सारे क्षण नव्याने जगावे
फक्त तु आणि मी बाकी कोणी नसावे
मॄगजळाच्या मागे का ग धावते
हा तुझा अस्पष्ट्पणा नेहमीचं
भावतो कोमल मनास माझ्या
असूनही तुझे हे नसणे जागेवरी
मन तुझे विचारात असते कुणाच्या??
तू जाताना काही न सांगीतले
पुन्हा भेटू कधी ही मनी आस आहे
अजूनही तू अगदी तशीचं असावी
की हा तर मनाचा खुळा भास आहे
माला वाटते रे आता पुन्हा जन्मावे
परत फिरुनी फक्त तुलाचं भेटावे
परत सारे क्षण नव्याने जगावे
फक्त तु आणि मी बाकी कोणी नसावे
