संध्याकाळ आयुष्याची आज मावळून गेली ,
जीवनज्योत दिव्यातील आज विझून गेली …..
जगलो फक्त सुखाच्या प्रतीक्षेत आजवर ,
दु:खाची घागर आज ओलांडून गेली ….
तेवलो जन्मभर पौर्णिमेचा चंद्र होऊनी ,
त्या चमकत्या रात्रीची आज अमावस झाली ....
झिजलो तयासाठी चंदनासम आयुष्यभर ,
त्या सुगंधाचीच आज अत्तरे उगळली ….
झुरलो सतत स्वप्नांच्या पाऊस धारांसाठी ,
कडकडती वीज स्वप्नांवर आज कोसळून गेली ….
धडपडलो सतत यशस्वी आयुष्यासाठी ,
नाण्यांची पदके हि आज हरवून गेली …..
अंतिम क्षणी निरोप घेताना या जगाचा
चार थेंब अश्रुंचे मज देवून गेली ,
संध्याकाळ आयुष्याची आज मावळून गेली …..
