Jun 30, 2012

तुला हि एकदा प्रेम खरे प्रेम व्हावे



अर्थ माझ्या अपेक्षांचा,
कधीच नाही समजला तुला.
"म्हणून"
तुला हि एकदा प्रेम खरे प्रेम व्हावे,
जो कधी होणारनाही आपला त्याचे
तू हि होऊन जावे,
तू हि एकांता मधे
क्षणा क्षणाला जावे,
सांतवन करायला तुझे,
सोबतीला तुझ्या अश्रू
देखील ना यावे...
तूला हि घ्यावा लागावा कल्पनेचा आधार,
कल्पनेतूनच चार क्षण सोबतीचे
त्याच्या,तू हि मागावे उधार,
तू हि एकट पावसात चिंब
चिंबभिजावं..
सोबतीला कोणी नाही या विचाराने
तुझ हि हृदय क्षणात थिजाव..
मग पावसाचा आधार घेत
तुही मनसोक्त रड रड रडावं..
विरहाने त्याच्या, तुला हि वाटावे
हे जग आता सोडाव..
तुला हि एकदा प्रेम खरे प्रेम व्हावे,
जो कधी होणारनाही आपला त्याचे
तू हि होऊन जावे..