Jul 1, 2012

जगी माऊली सारखे कोण आहे ।

 
जगी माऊली सारखे कोण आहे

जिचे जन्मजन्मांतरी ऋण
आहे।।
असे ऋण हे की जया व्याज
नाही।
ऋणाविन त्या जीवना साज
नाही ।।
जिने
सोसल्या यातना कोटी कोटी ।
तुला जन्म लाभे तिच्या पुण्य
पोटी।।
जिच्या यातनाचे जगी मोल
नाही ।
तिच्या सारखा लाघवी बोल
नाही।।
जिने
लाविला लेकरांना लळा या।
तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळा या ।।
जिच्या पूजनाला जगी फूल
नाही ।
अशा देवतेचे जगी नाव आई।।