Jul 12, 2012

तुम्ही तुमच्या पुढल्या पिढीसाठी काय करताय !”



सुरेशचा एका आजोबां सोबत वाद सुरु होता. तो म्हणाला,”आजोबा, तुमचा काळ वेगळा होता. आज बघा आमच्याकडे फास्ट कार आहेत, टिव्ही आहेत ज्यावर कायम काहीतरी सुरु असते, जेट विमाने आहेत, अंतराळ प्रवासासाठी वाहने आहेत आणि…………….. सुरेश थांबलेला बघुन आजोबा म्हणाले,”हे सर्व आमच्या पिढीने शोधले तुमच्या पिढीसाठी ! तुम्ही तुमच्या पुढल्या पिढीसाठी काय करताय !”




वत्सलाकाकू वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रथमच विमान प्रवास करित होत्या. त्यामुळे त्या बर्‍याच अस्वस्थ होत्या. विमानात चढल्यावर त्या पायलटला भेटल्या व म्हणाल्या,”अरे मला सुखरुप परत उतरवशिल ना ?” पायलट म्हणाला, “खर सांगु का आजी. मी पंधरा वर्षे विमान चालवत आहे. पण अजुन कुणाला आकाशात सोडून आलो नाही.”





आंधळा भिकारी : सुंदरी, मला ५ रुपये दे ना. काल पासुन उपाशी आहे. बाईचा नवरा भिकार्‍याला १० रुपये देतो. बाई : अहो हे काय त्याने पाच रुपये मागितले होते ना ? नवरा : अग तो खरच आंधळा आहे. त्याने तुला सुंदरी म्हटले !