सागरात परतताना लाटांनी फेडलं होतं ऋण…तू येताना वाळूत उमटली तुझी पाऊल खुण…!!!
डोळ्यांत जरी असले अश्रू तरी इतरांसाठी हसावं लागतं आशेच्या उजेडात कधी कधी निराशून रुसावही लागतं !
आज गेला उदया जाईल परवाचं मग स्वागत होईल, जीवनाचं आपलं गलबत असंच पुढे जात राहिलं.
कवितेतले शब्द माझे मी हजारदा गिरवले,तरीही न सांगता ते माझ्या लेखणीतून हरवले.कुण्या अज्ञात जगात ते निश्चिंत वावरले,आणि मी आत्ताशी कुठे माझ्या मनाला सावरले.
