Jul 11, 2012

रवी जाधव...लेखक-दिग्दर्शक



मराठी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत पसिध्दीस आलेलं नाव म्हणजे... रवी जाधव. आपल्या कर्तृत्वानं त्यांनी जाहिरात क्षेत्र गाजवलंच आणि चित्रपट दिग्दर्शन माध्यमातही यशस्वी पदार्पण केलं. ‘नटरंग’ आणि ‘बालगंधर्व’ सारख्या कलात्मक दर्जेदार चित्रपटांच्या त्यांनी केलेल्या दिग्दर्शनाला मराठीसोबत अमराठी पेक्षकांनीही मनमुराद दाद दिली. नेहमीच वेगळा विचार घेऊन दर्जेदार कलाकृती साकारणारे लेखक-दिग्दर्शक रवी जाधव आता ‘बीपी’ या नवा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीला लागले आहेत. अंबर हडप, गणेश पंडीत लिखीत ‘बीपी’ या एकांकिकेवर आधारलेला हा चित्रपट रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने रुपेरी पडदयावर साकारत आहे. ‘विवा इन एन’,‘रवी जाधव फिल्मस’ निर्मित ‘बीपी’ या चित्रपटाची कथा आहे पौंगडावस्थेतील मुलांची... त्यांच्या भावविश्वाची... पत्येकाच्या आयुष्यात येणारा हा महत्त्वाचा टप्पा. लैंगिकता आणि त्या अनुषंगाने येणा-या अनेक गोष्टींबदद्ल मुलांच्या मनात कुतूहल आणि शंका निर्माण करणारा हा काळ. या काळात मुलं संभ्रमित आणि गोंधळलेली असण्यामागचं हे एक मुख्य कारण. 13/14 वर्षाच्या या मुलांना आयुष्यात अनेक पश्न पडलेले असतात. त्या पश्नांची उत्तरे पालकांकडून न मिळाल्यामुळे बाहेर शोधण्याचा पयत्न केला जातो आणि त्यामुळे नवीन समस्या निर्माण होतात. पण पालकांनीच जर आपल्या मुलांचे मित्र होऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला तर या समस्या निर्माण होणार नाहीत. मुलांचे आयुष्य सुखकर होईल. ‘बीपी’ या चित्रपटात हाच नाजूक विषय हळूवाररीत्या हाताळण्यात येत आहे. चित्रपटाची कथा गणेश पंडीत आणि अंबर हडप यांनी लिहीली असून पटकथा संवाद आहेत रवी जाधव,गणेश पंडीत आणि अंबर हडप यांचे.

‘बीपी’ चित्रपटाचे युवा निर्माते उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी रवी जाधव यांच्या सोबत चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी न्यूयॉर्क येथे फिल्म मेकींगचे पशिक्षण घेतले आहे. हिंदी चित्रपटांत अनेक सुपरहिट गीते देऊन पेक्षकांना आपल्या ठेक्यावर नाचवणारे संगीतकार विशाल-शेखर ‘बीपी’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पवेश करीत आहेत. चित्रपटाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहीली आहेत. सुपसिध्द छायाचित्रकार महेश लिमये यांच्या कॅमेरा अँगलने चित्रीत होणा-या या चित्रपटाचे कलादिग्दर्शन दिलीप मोरे यांनी केले आहे.

किशोर कदम, सई ताम्हणकर, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार,अविनाश नारकर, सुबोध भावे यांच्या पमुख भूमिका असलेल्या ‘बीपी’ चित्रपटात मदन देवधर,शास्वती पिंपळकर, भाग्यश्री शंकपाल, पथमेश परब, रोहीत फाळके या बालकलाकारांच्या पमुख भूमिका आहेत. पौगंडावस्थेतील मुलांची मानसिकता आणि त्यांना पडणारे विविध पश्न मांडणारा ‘बीपी’ लवकरच पदर्शित करण्याचा निर्माता-दिग्दर्शकांचा मानस आहे.