गुन्हेगारांचा कर्दनकाळ, निर्भिड व चतुर वकील, उत्तम वक्ता, प्रतिभावंत कवी असे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या अॅड. उज्ज्वल निकम यांचे जीवन अनेक नाट्यमय प्रसंगांनी भरलेले आहे.अशा या व्यक्तिमत्त्वाची भुरळ एखाद्या चित्रपटनिर्मात्याला पडली नाही तर नवल! अॅड. उज्ज्वल निकम यांच्या प्रेरणेतून पिंपरी-चिंचवडमधील चित्रपट दिग्दर्शक सुवदन आंग्रे हे 'कायद्याचा आदेश' या नवीन चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
भारतीय लोकशाहीमध्ये कायदा आणि न्यायप्रणालीला अनन्यसाधारण महत्व आहे. वकील म्हणजे न्यायप्रणालीचा चेहरा होय. एक वकील म्हणून विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी मोलाचे कार्य केले आहे. वकिलीतील त्यांच्या हातखंड्यामुळे अनेक निरपराधांना न्याय मिळाला असून गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा झाली आहे. त्यामुळे कायदा आणि न्यायसंस्थेबाबत सकारात्मक संदेश गेला आहे. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन 'कायद्याचा आदेश' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
अॅड. निकम यांना केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. स्वतः दिग्दर्शक सुवदन आंग्रे हे मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. दोष, सुसाईड, पुढची तारीख या चित्रपटांचे दिग्दर्शक तर मंगल पांडे, द मिथ, तारे जमीं पर, स्वदेश, ओम जय जगदीश आणि शिखर या चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून आंग्रे यांनी काम पाहिले आहे. दिग्दर्शक आणि सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणारे आंग्रे 'आदेश' या चित्रपटातून प्रथमच मुख्य भूमिका साकारत आहेत.
अॅड. निकम यांची कामकाजाची पध्दत, बोलण्याची शैली आणि शेरोशायरी या चित्रपटातील मुख्य नायकाच्या भूमिकेतून अनुभवता येणार आहे. वकिली व्यवसायातील स्पर्धा, कायद्यातील खाच-खळगे, वकिलांवर येणारी संकटे, वकिलांबाबत सरकारचे धोरण, त्यातील विसंगती आणि बरेच काही या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कायदा आणि न्यायप्रणालीशी संबंधित अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट आले आहेत. त्यात एकाच खटल्याला केंद्रीत करण्यात आले आहे. मात्र, आदेश या चित्रपटात मुंबई येथील 1993 मधील बॉम्बस्फोट ते 26-11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्या खटल्यापर्यंतच्या अनेक खटल्यांतील प्रसंग आणि गुंता दाखविण्यात आला आहे.
कायदा आणि न्यायप्रणालीशी संबंधित तसेच वकिली व्यवसाय करणारे आणि या व्यवसायात येऊ इच्छिणारे तसेच मराठी चित्रपटात नायकाचा शोध घेणा-या चित्रपटप्रेमींसाठी हा चित्रपट पर्वणी ठरेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही