दृष्टीदाता...०४ जानेवारी १८०९ रोजी जन्म झालेल्या अंधजनांचा महानायक "लुई ब्रेल" यांचा
जन्मदिवस...
डोळसांच्या दुनियेत तो अंध होता पण..अंधांच्या दुनियेत तो होता ...दृष्टिदाता... ‘ब्रेल लिपी’..अंधांची लिपी..! अंधांच्या विश्वात ब्रेल लिपीला अतिशय महत्वाचे स्थान आहे.
अंध-शिक्षणाचा आजपावेतो जो काही विकास झालेला आहे,होत आहे त्याचे प्रमुख श्रेय जाते ते केवळ ब्रेल लिपीला..आज साऱ्या जगाला हि लिपी परिचयाची आहे,पण अश्या ह्या लिपीचा अविष्कार करणारी व्यक्ती कोण?..की ज्या व्यक्तीमुळे अंध देखील डोळसांप्रमाणे प्रगती करतात आहे... ते महान संशोधक होते..मि. लुई-सिमोन ब्रेल..एक अंध शिक्षक..!
जवळ-जवळ १५ वर्ष निरंतर कठोर साधना, परिश्रम करून त्यांनी ही लिपी तयार केली..नी त्यावेळी ते केवळ १५ वर्षीय शाळेकरी बालक होते..ही लिपी अंधांना उपयुक्त आहे हे प्रयोगाद्वारे सिद्धही झाले, पण शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि फ्रेंच सरकारने तिला अधिकृत मान्यता दिली नाही. तरीही ब्रेल यांनी आपला प्रयत्न सोडला नाही. शेवटपर्यंत ते आशावादी राहिले...
ब्रेल ला प्रसिद्धीचा हव्यास मुळीच नव्हता, फार निःस्वार्थीपणे जगले ब्रेल,सदिच्छा एकच होती की, ह्या लिपीचा वापर करुन अंधानांही स्वतःच्या भावनांना रेखाटण्याचा आनंद मिळावा.. लुईस ब्रेल स्वभावाने अतिशय नम्र होते, विनयशील होते. त्यांच्या अंगचे गुण, त्यांचे उदार मन, विशाल हृदय, प्रसन्नचित्त राहण्याची लकब हे सारं-सारं वाखाणण्याजोगे होते..
लुईस ब्रेल हे गाढ शांतीचे जलाशय होते,ज्यांनी कधीच रुद्र रुप धारण केले नाही. उलट त्यात सामावलेली होती अटूट माया..निरपेक्ष प्रेम..ईश्वराप्रती अतोनात श्रद्धा-भक्ती..नी प्रसन्न आनंद..!
स्वतःच्या वैयक्तिक जीवनात त्यांनी नेहमी दुःखे भोगली, नियतीने त्यांच्यावर एकामागून-एक आघात केले, सुख म्हणून त्यांना कधी लाभलेच नाही.तरीही त्या महान आत्म्याने कुणाकडे तक्रार केली नाही...जे त्यांच्या हक्काचं होतं,परिश्रमाचं होतं..नियतीने तेही उपभोगू दिलं नाही, तरीही शेवटी आपला शोध जगाला समर्पित करून ते जगातून निघून गेले..
शोकांतिका ही की, जिवंतपणी नव्हे तर त्यांच्या मरण्णोत्तर ब्रेल-लिपी जग मान्य झाली...आणि ह्याच लिपीच्याद्वारे लुईस ब्रेल प्रत्तेक अंधाच्या मनात अद्यापही जिंवत आहेत...राहतील...