Jul 10, 2012

कोळंबी भात



कोळंबी भात

साहित्यः
दीड वाटी बासमती तांदुळ
दीड वाटी स्वच्छ केलेली कोळंबी
३ वाटया नारळाचे दुध
२-३ टेस्पून आले+लसुण+मिरची+पुदीना पेस्ट
१ टेस्पून लाल तिखट
१/२ टेस्पून गरम मसाला
१/२ टेस्पून धणेपुड
१/४ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
१ टीस्पून शाहीजिरे किंवा साधे जिरे
४-५ लवंग
२-३ दालचिनीच्या काडया
२-३ तमालपत्र
२-३ हिरवी वेलची
तेल.



पूर्वतयारी :
दीड वाटी बासमती तांदुळ स्वच्छ धुवून, निथळून ठेवणे
दीड वाटी स्वच्छ केलेली कोळंबी किंचित मीठ, हळद व लिंबाचा रस लावून ठेवावी




पाककृती :
जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून शाहीजिरे व खडा-मसाला घालावा.
छान तडतडले की त्यात आले+लसुण+मिरची+पुदीना पेस्ट घालून परतणे.
परतून झाले की त्यात हळद, मीठ लावून ठेवलेली कोळंबी घालावी व परत चांगले परतणे.
त्यात सर्व मसाले, मीठ घालून परतणे.
आता भिजवून, निथळत ठेवलेला तांदुळ घालून हलक्या हाताने एकत्र करावे.
छान परतले की त्यात ३ वाटया नारळाचे दुध घालावे. (नारळाच्या दुधात शिजवल्याने चव छान लागते)
दुसरा पर्याय म्हणजे २ वाटया नारळाचे दुध +१ वाटी पाणी घालावे व उकळी आणून मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवावे.
कोथिंबीर घालून सजवावे व लगेच गरमा-गरम खायला सुरुवात करावी