Jul 8, 2012

चिकनचे लोणचे



चिकनचे लोणचे
साहित्य :
२ वाट्या चिकनचे बोनलेस तुकडे, २ टीस्पून मिरची पावडर, १ टीस्पून मीठ, २ टीस्पून साखर, २ टेबलस्पून व्हानिगर, १/४ टीस्पून हळद,
पाव वाती सुके खोबरे किसून, ४ टेबलस्पून तेल

वाटण मसाला :
१५ लसूण पाकळ्या, १ इंच आले ( बारीक चिरावे किंवा जाडसर वाटावे )

फोडणी :
२ टीस्पून मोहरी, १/२ टीस्पून हिंग
कृती : २ टेबलस्पून तेल तापल्यावर आले-लसूण घालून गुलाबी रंगावर परतावे. नंतर त्यावर खोबरे घालून गीलाबी रंगावर परतावे.
नंतर त्यावर चिकन,हळद,मीठ घालून परतावे व झाकणावर थोडे पाणी ठेवून मंद गॅसवर वाफेवर शिजवावे.
( चिकनमध्ये शिजताना पाणी घालू नये.) चिकन शिजल्यावर गॅस बंद करून चिकन थंड होऊ ध्यावे.
एका पातेलीत २ टेबलस्पून तेल तापल्यावर हिंग-मोहरीची फोडणी ध्यावी व गॅस बंद करून मिरचीपावडर घालावी.
फोडणी थंड झाल्यावर चिकनमध्ये घालावी. व्हीनीगर व साखर घालून चिकन चांगली ढवळून एकजीव करावी

टीप :
हे लोणचे फ्रीज मध्ये ठेवल्यास ८ दिवस टिकते. जास्त दिवस लोणचे टिकायला पाहिजे असल्यास चिकनचे तुकडे
हळद व मीठ लावून तेलात टाळून घ्यावेत व फोडणी थंड झाल्यावर सर्व एकत्र करावे. लोणच्याला हाथ लागू
देऊ नये. खोबरे व तेल थोडे जास्त घालावे.