Jul 8, 2012

तुमचा भाग्यांक कोणता व्यवसाय किंवा करिअर दर्शवतो ?



तुमचा भाग्यांक कोणता व्यवसाय किंवा करिअर दर्शवतो ?

तुम्ही तुमच्या करीयरच्या बाबतीत चिंतेत असाल तर आता करीयर काऊंसेलरकडे जाण्याची गरज नाही, तुमच्या भाग्यंका नुसार तुम्ही करीयरची निवड करू शकता. ती कशी ते आता आपण पाहू......

भाग्यांक १ :
या भाग्यंकाचे लोकांना सतत नाविन्याची आवड असल्याने हे लोक एकाच नोकरी किंवा व्यवसायामध्ये फार काळ राहत नाहीत. सर्वसाधारण पणे ३ ते ४ वर्षांनी नोकरी किंवा व्यवसायामध्ये बदल करतात. खेळाडू,न्यायव्यवस्था, प्रशासन, परराष्ट्रीय वकील, वैद्यकिय, इलेक्ट्रॉनिक, संशोधन, एखाद्या विभागाचे प्रमुख किंवा म्यानेजर अशा क्षेत्रात रस घेणारे असू शकतात. या कामात जास्त धावपळ करावी लागत नाही. या नंबरच्या लोकांसाठी बौद्धिक काम करायला आवडते.

भाग्यांक २ :
या भाग्यंकाचे लोक सृजनशील असतात. तसेच उत्तम कल्पनाशक्तीचा विकास असल्यामुळे संगीताला चाली लावणे,प्रणय कादंबर्या लिहिणे,पेंटीग,नाट्यकृती, कविता यात यश मिळते. तसेच हे लोक केमिस्ट किंवा प्रयोग शाळेशी साम्भंधित असू शकतात. जल तथा वायूशी संबंधित काम, शिक्षणक्षेत्र, जाहिराती, चित्रपट या व्यवसायांशी त्यांचा संबंध येऊ शकतो. त्याच प्रमाणे गूढ विद्यांची आवड असल्याने ज्योतिष विषयात सुद्धा पारंगत असतात. तसेच दुध,द्रव पदार्थ , वनस्पती किंवा भाज्या या क्षेत्राशी सुद्धा यांचा संभंध येतो व या मध्ये हे लोक चांगले यश मिळवताना दिसून येतात.

भाग्यांक ३ :
ज्यांचा भाग्यांक 3 आहे अशा मंडळींचा सर्व सामान्यांचे व समाजाचे कल्याण करण्याकडे ओढा जास्त असतो त्यामुळे हे लोक समाजसेवा, राजकरारण, मंत्री, राजदूत, न्यायाधीश, सचिव, समुपदेशक, शिक्षक अशा कामात यशस्वी होतात. हॉटेल व्यवसाय, शिक्षण, तसेच वैद्यकीय क्षेत्रात हि हे लोक चमकू शकतात. समाजाला प्रबोधन करणे किंवा ज्ञान देणे किंवा समाजाचे भले करणे अशा कामात या व्यक्ती यशस्वी होताना दिसतात.

भाग्यांक ४ :
या भाग्यंकाचे लोकांना वेगवान कामात रस असतो. सर्व तर्हेची मशिनरी, इलेक्ट्रिसिटी या कामात धावपळ यांना आवडते. त्याच प्रमाणे विमानाचे पायलट, इंजिनियरिंग, बांधकाम व्यवसायिक, कारखानदार तसेच शास्त्रज्ञ सुद्धा असू शकतात. ही मंडळी लॉटरी, केमिकल, धातूशी संबंधित कार्य चांगल्या प्रकारे करू शकतात. त्याच प्रमाणे गूढ विद्यांची आवड असल्याने ज्योतिष विषयात सुद्धा पारंगत असतात.

भाग्यांक ५ :
या भाग्यंकाचे लोकांमध्ये कोणत्याही व्यवसायात पडण्याची क्षमता असल्याने जो व्यवसाय कराल त्यात यश मिळेल. मुख्यत्वे व्यापार-व्यवसायात निपुण असतात. या लोकांसाठी शेयर बाजार,शिक्षण क्षेत्र, कॉमर्स, बँकिंग, अकाउंटशी संबंधित कामे यांच्यासाठी शुभ आणि फायदेशीर ठरतात. तसेच छोटे छोटे क्लासेस चालवणे किंवा बोलण्यात व वाद विवाद करण्यात प्राविण्य असल्याने सेल्समन किंवा वकिली क्षेत्रातही नाव कमावतात.

भाग्यांक ६ :
ज्या लोकांचा भाग्यांक ६ असतो ती मंडळी कला क्षेत्रात जास्त प्रगती करतात. सिनेमा, कला, फॅशन, टीव्ही शो, ग्लॅमर वर्ल्ड, पेंटिंग, सजावट, इत्यादी कामात ते निपुण असतात. या क्षेत्रात त्यांना यशही भरपूर मिळते. तसेच आर्किटेक, इंटिरियर डिझायनर, जवाहीर तज्ञ , संगीत तज्ञ, हॉटेल म्यानेजर किंवा मेवा मिठायीच्या व्यवसायात देखील खात्रीशीर यश मिळवतात. त्याच प्रमाणे जमीन जुमल्याचे व खरेदी-विक्रीचे दलाल, मोबदला घेऊन काम करणारे दलाल इत्यादी व्यवसायात सुद्धा यश मिळवतात.

भाग्यांक ७ :
ज्यांचा भाग्यांक ७ आहे अशा लोकांना परदेशा बद्दल फार आकर्षण असल्याने परदेशातील मालाची ने आण करण्याच्या व्यवसायात तसेच पर्यटन व्यवसायात या लोकांना खात्रीशीर यश मिळते. यांना नोकरीपेक्षा व्यापार जास्त फायदेशीर ठरतो. दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, केमिकल्स, जहाजावर काम करणारे अशा ठिकाणी सुद्धा हे लोक नाव कमावतात. त्याच प्रमाणे वैद्यकीय व्यवसायात सुद्धा हे लोक चमकतात.

भाग्यांक ८ :
ज्यांचा भाग्यांक ८ अशा व्यक्ती पोलिस, सैन्यदल, सिक्युरिटी, टुरिझम, वकिल बनू शकतात. तसेच खाणी, लाकूड , लोखंड, जमीन, पाळीव प्राणी व स्टीलच्या व्यवसायातसुद्धा या लोकांना यश मिळू शकते. तसेच हे लोक उत्तम व्यवस्थापक व कंपनी सेक्रेटरी होऊ शकतात. तसेच जेथे सेवा नि कनिष्ट कामे करण्याची परिस्थिती असते अशा ठिकाणी हे लोक दिसून येतात. उ द. प्रिंटींग प्रेस परंतु या लोकांना नोकरी किंवा व्यवसायात खूप कष्ट घ्यावे लागतात. या लोकांना कष्टाच्या प्रमाणात यश थोडे कमी व उशिरा मिळते.

भाग्यांक ९ :
या भाग्यंकाचे लोक प्रत्येक क्षेत्रात सापडतात जेथे धैर्य व आक्रमकता आहे अशा क्षेत्रात म्हणजेच पोलीस किंवा सैन्यात यांना यश चांगले मिळते व सैन्यात जबाबदारीच्या जागा हे लोक पटकावतात. तसेच हे लोक बोलण्यात माहिर असल्यामुळे नेता, सरकारी अधिकारी, पब्लिक रिलेशन ऑफिसर, रेडियो जॉकी बनू शकतात. तसेच हे लोक उत्तम डॉक्टर, केमिस्ट किंवा लोखंडाच्या साम्भंधित आपला स्वता:चा व्यवसाय सुरू करू शकतात. या लोकांमध्ये नेतृत्वगुण असल्यामुळे कुणाच्या हाताखाली काम करणे अवघड जाते.

जीवनात कुठल्या ही करियरची निवड करण्या अगोदर फक्त आपण आपली आवड नव्हे तर आपली योग्यता व आपला भाग्यांक या कडे सुद्धा तुम्ही लक्ष दिले तर करियर मध्ये यश मिळवणे नक्कीच सोपे होईल. वरील माहितीचा आपणास आपल्या जीवनात नक्कीच फायदा होईल !