Jul 10, 2012

जंक फूड्‌सचा धोका वाढतोय



मॅगी, रमेन नुडल्स, मॅकडोनल्ड्‌स, केएफसीचे फ्राइड चिकन आणि हल्दीरामचा आलू भुजिया अशा वेगवेगळ्या 16 खाद्य पदार्थांच्या कंपन्यांचा आणि त्यांच्या पदार्थांचा सर्व्हे केल्यावर धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सेंटर फॉर सायन्स अँड इन्व्हायरमेंट या संस्थेने हा सर्व्हे केला.

या सर्व्हेचा उद्देश लोकांची दिशाभूल रोखून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे आहे. बहुतांश जंक फूड्‌समध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्स फॅट्‌स (तब्येतीसाठी हानिकारक असलेले फॅट्‌स), साखर आणि मीठ असतं जे प्रकृतीसाठी अत्यंत हानिकारक असून मधुमेह, लठ्ठपणासारख्या रोगांना कारणीभूत ठरते.

या कंपन्या आपल्या पदार्थांबद्दलची चुकीची माहिती देऊन वा माहिती लपवून ग्राहकांची दिशाभूल करताहेत असे सीएसईचा सर्व्हे म्हणतो. तरुणाई मोठ्या प्रमाणावर जंक फूडकडे आकर्षित होतेय आणि त्यामुळे तरुण वयात हृदयविकाराला बळी पडण्याचा धोका वाढतोय, असेही यात म्हटले आहे..