Aug 16, 2012

कष्टही करतो घामही गाळतो



कष्टही करतो घामही गाळतो,
दाह करतो जीवाचा,
भाव नाही पीकाचा,
अहो शेतकरी किती मोलाचा,

दिनरातही झटतो, पिलांनाही घालतो,
नांगर करतो खांद्याचा,
आराम नाही जीवाचा,
अहो शेतकरी किती मोलाचा,

भाकरीसाठीही लढतो, सावकारीही फेडतो,
त्याग ही करतो जिंदगीचा,
नाही संसार सुखाचा,
अहो शेतकरी किती मोलाचा