Aug 5, 2012

प्रेम म्‍हणजे काय.....


प्रेम  म्‍हणजे काय......


मला माझ्या मित्राने विचारले
कि प्रेम म्हणझे नेमके काय ?

मी त्याला सागितले की,
कितीही जवळ जाणार असेल
तरी गाडी सावकाश चालव
आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे
काळजीचे बोल म्हणजे ''प्रेम''

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे
न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे
महागातले जीन्स आणि कपडे घेणारे
बाबा म्हणजे ''प्रेम''

कितीही मस्ती केली व रात्री लेट
झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच
दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे ''प्रेम''

कितीही वाद झाले तरी
दादा जेवलास का ?
अशी विचाणारी बहिण म्हणजे ''प्रेम''

पगार कितीही कमी असेल
तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे
घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे ''प्रेम''

आणि या सर्वांची काळजी घेवून
स्वतःची काळजी न करता
सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी
बायको म्हणजे ''प्रेम''