आई
आई सर्वांनाच हवी असते
आपली हाक ऐकण्यासाठी
हवे तेव्हा आपल्यासाठी
आपले म्हणून राहण्यासाठी .
आईस्वरूप
अमृत समान आहे आईचे स्वरूप
त्यात सामावले विश्वरूप
तरी ती आहे मांगल्य रूप
तरी बनावे तीर्थरूप
जगात चाललेल्या अन्यायाविरुद्ध
काहीतरी करायचे म्हणून
त्यांनी घेतले फक्त
आपले डोळे घट्ट मिटून ....