वेडावलो मी आज
त्या चंद्र कोरीस पाहतांना
दिसलीस मजला तू
त्यात लाजतांना
पाहिले तुझा चेहरा
हातांनी झाकतांना
मी दिसता तुझ्या
अधरांनी गोड हसतांना
कसे मोहित केले
तू माझ्या लोचनांना
मलाही कळले नाही
माझे भान हरवतांना
बेभान झालो मी
तुझ्यावर नजर खिळतांना
गंध आला प्रितीचा
घेतलेल्या श्वासांना .