May 24, 2012

गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.



प्रश्न :- गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तर :- शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून.


प्रश्न :- उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर :- एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.




मुलगा : बाबा बाबा... लग्न करायला किती खर्च येतो हो?
बाबा : माहीत नाही बाळा. पण मी अजूनही तो भरतोय.




गोपाळ्ला कफे गुडलकसमोर उभा असलेला बघुन चाट पडलेल्या रमेशने त्याला हाक मारली. रमेश म्हणाला, "काय रे गोपाळ, अरे तु मेला होतास ना?"
"काय, मेलो होतो म्हणतोस ?" आश्चर्यचकित होउन गोपाळ म्हणाला, " अरे, मी मेल्याचं तुला कोणी सांगितलं ?"
"मला परवाच पप्पुने सांगितलं" - इति रमेश.
"मग हि बातमी साफ खोटी आहे याची आता तरी खात्री झाली ना " - गोपाळ.
"नाही, अजुन माझी खात्री नाही. तुझ्या पेक्षा पप्पुवर माझा विश्वास आहे."