Jul 11, 2012

'बुवाचा हनू' या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पार पडले



मराठी चित्रपट सृष्टीत अधिराज्य गाजविणाऱ्या दादा कोंडके यांच्या शैलीतील विनोदाची आठवण करून देणाऱ्या 'बुवाचा हनू' या चित्रपटाचे चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील औंध, कोरेगाव, संगम माहुली परिसरात नुकतेच पार पडले. हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

कडक ब्रम्हचर्याचे पालन करणारा बुवा आणि त्याचा शिष्य हनू यांच्या गमतीदार करामतींवर आधारित हा चित्रपट निखळ मनोरंजन करणार असणार आहे. निर्मल फिल्मसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दाउद शेख यांनी केले आहे तर दिलीपकुमार डोंगरे यांनी अत्याधुनिक तंत्राच्या सहायाने चित्रीकरण केले आहे. चित्रपटात संजय मोहिते यांची मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्यासह सतीश तारे, विजय कदम, सुनील गोडबोले, लक्ष्मण कांबळे, शिरीष कुलकर्णी , रेश्मा जोशी, रोहित चव्हाण, अजय पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन थोरात यांचे असून प्रदीप कदम यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.