जो सांगून घडत नाही त्यालाच योगायोग म्हणतात. या योगायोगाची जादू काय असते ते प्रत्येकानेच कधी ना कधी आपल्या आयुष्यात अनुभवली असेलच. आता ही जादू रुपेरी पडद्यावरही अनुभवायला मिळणार आहे. विनिता क्रिएशन्सची निर्मिती तसेच मिलिंद देविदास पाटील यांच्या एचडी मुव्हीजसी प्रस्तुती असलेल्या ‘योगायोग’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेडयुल नुकतेच पूर्ण करण्यात आले.
महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी ‘योगायोग’च्या चित्रीकरणाचे पहिले शेडयुल पूर्ण करण्यात आले. ७ दिवसांच्या पहिल्या शेडयुल्डमध्ये आऊटडोर तसेच काही इनडोअर चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. भरतराज यांच्या दिग्दर्शनाखाली बनणा-या या सिनेमात रसिकांना मनोरंजनाचे परीपूर्ण पॅकेज मिळणार आहे. आपल्या जुन्या आठवणींमध्ये रमलेल्या एका तरुणाची ही कथा आहे. कॉमेडी, अॅक्शन, रोमांस, इमोशन आणि गीत-संगीताचा बहारदार नजराणा या सिनेमाच्या निमित्ताने रसिकांसमोर सादर करण्याचा आपला मानस असल्याचे भरतराज यांचे म्हणणे आहे. आजच्या काळात रसिकांना आपले दु:ख विसरायला लावून निखळ मनोरंजन करणा-या सिनेमांची आवश्यकता आहे. ‘योगायोग’ या व्याख्येत अगदी फिट बसत असल्याने इतरांपेक्षा वेगळा मसाला यात पाहायला मिळेल. प्रशांत शिंदे या सिनेमाचे दुसरे दिग्दर्शक आहेत.
मराठीतील देखणा अभिनेता म्हणून प्रसिद्धीस पावलेला अंकुश चौधरी या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय नेहमीच विविधांगी भूमिका साकारणारा सिद्धार्थ जाधवही ‘योगायोग’मध्ये पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या हिंदी रिअॅलिटी शोद्वारे प्रकाशझोतात आलेल्या सिद्धार्थचे नवे रूप ‘योगायोग’मध्ये पाहायला मिळेल. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री सिया पाटील या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय दिपक शिर्के, विजू खोटे, विकास समुद्रे, अंजली उजवणे, ज्योत्सना आदी कलाकारांच्या ‘योगायोग’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
बी. राज यांच्या लेखणीतून आकाराला आलेल्या कथेवर साईदास यांनी ‘योगायोग’ची पटकथा रचली आहे. सुप्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर यांनी या सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. जाफर सागर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतरचनांना चिनार-महेश ही मराठीतील एक आघाडीची संगीतकार द्वयी स्वरसाज चढवणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रामजी या दक्षिणेकडील सुप्रसिद्ध कॅमेरामनच्या कॅमे-यातून महाबळेश्वरमधील निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी मराठी रसिकांना मिळणार आहे.