दसरा हा अश्र्विन शुक्ल दशमीला येणारा सण आहे. उत्तम मुहूर्तापैकी एक दसरा हा दिवस मानला जातो. या दिवसाशी अनेक प्राचीन, पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. निसर्गावर श्रद्धा किंवा निसर्गाचे संवर्धन याच्याशी आपल्या प्रत्येक सण-उत्सवाचा संबंध जोडलेला आहे. या दिवशी आपट्याचे पान एकमेकांना सोने म्हणून देण्याची पद्धत आहे. चांगल्या कामाची सुरुवात करण्याचा हा दिवस एकमेकांना भेटून, गोड-धोड करून साजरा करतात.
आपट्याच्या झाडाची लागवड करणे असेही आता निसर्ग रक्षणासाठी करण्याची गरज आहे. पाने-फांद्या तोडून त्याचा दुसर्या दिवशी रस्तोरस्ती कचरा करण्यापेक्षा ‘सोने’ जपून वापरून, आपट्याची झाडे लावून दसरा करावा असे मत पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते व्यक्त करतात.
विजयादशमीला श्रीरामाने रावणाचा संहार केला. या पराक्रमाची आठवण म्हणून या दिवशी ठिकठिकाणी रावणाच्या प्रतिमांचे / पुतळ्यांचे दहन केले जाते. दुष्प्रवृत्तीचे निर्दालन अशी त्यामागची भावना आहे. अनेक चांगल्या, मोठ्या कामांची सुरुवात या दिवशी केली जाते. या दिवशी निश्र्चयाने कामांना सुरुवात केल्यास हमखास यश मिळतेच अशी लोकांची श्रद्धा आहे.