कोजागिरी पौर्णिमा (अश्विन पौर्णिमा) हा पावसाळ्यानंतर येणारा आकाश निरभ्र असण्याचा पहिला दिवस होय. या रात्री आकाश स्वच्छ असल्यामुळे चांदणे व पूर्ण चंद्राचा आस्वाद आपल्याला घेता येतो. रात्री श्रीलक्ष्मी व एैरावतावर बसलेल्या राजा इंद्राची पूजा केली जाते. उपोषण (उपवास), पूजन व जागरण या तिन्ही घटकांना या दिवशी सारखे महत्त्व असते. मंदिरे, घरे आदि ठिकाणी अधिकाधिक दिवे लावावेत - जेवढे जास्त दिवे तेवढा मानवाचा अधिक उत्कर्ष - असे या दिनाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे. हा दिवस व ही रात्र प्रामुख्याने श्रीलक्ष्मीच्या आराधनेची असते. पूर्ण असलेल्या चंद्रावरून लक्ष्मी पृथ्वीवर उतरते आणि `कोऽऽजागरति' `कोऽऽजागरति' असे विचारते. जो जागा असेल, त्यास लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हटले जाते.
लक्ष्मीला, इंद्राला व चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखविला जातो आणि सर्व मंडळी स्वत:ही दुग्धपानाचा आनंद घेतात. अलीकडे या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक होऊ लागले आहे. चंद्र, चांदणे व दूध यांचा आनंद मित्रमंडळी, कुटूंबीयांसमवेत लोक सार्वजनिक ठिकाणीही घेतात.