Aug 11, 2012

राखी पौर्णिमा


श्रावण पौर्णिमा याच दिवशी हा सण साजरा केला जातो. बहिणीने भावाला उजव्या हाताला रेशमी गोफ हे प्रेमाचे प्रतीक बांधून, नाते पक्के करण्याची ही पद्धत आहे. भावाच्या हाताला राखी बांधून, बहीण आपल्या रक्षणाची जबाबदारी भावाकडे सोपवते, नात्याचा बंध अधिक दृढ करते. उत्तर भारतातही हा सण पूर्वीपासून साजरा केला जातो.  संपूर्ण भारतभर हळूहळू याचे महत्त्व वाढू लागले आहे. ज्यांना भाऊ किंवा बहीण नाही, ते ही नाती प्रेमाने निर्माण करतात. मानवी नात्यांच्या माध्यमातून अशा विशिष्ट दिवशी एकत्र येणे, आनंदाचा अनुभव घेणे या निमित्ताने घडते